गेहलोतांनी वाचला मागील वर्षीचा अर्थसंकल्प; चूक लक्षात आल्यानंतर मागितली सभागृहाची माफी

राजस्थान, १० फेब्रुवारी २०२३ : राजस्थान विधानसभेत आज शुक्रवारी (ता. १०) २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे मागील वर्षीचा अर्थसंकल्प वाचत राहिले. काही मिनिटांनंतर राजस्थानचे पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी ही चूक मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर गेहलोत यांनी भाषण थांबविले.

या चुकीमुळे विरोधकांनी गदारोळ घातला. प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. अखेर सभागृहाची माफी मागून गेहलोत यांनी यंदाचा म्हणजे २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला.

गदारोळामुळे राजस्थान विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी म्हणाले, की आज सभागृहात घडलेला प्रकार दुर्दैवी होता. या घटनेने मला दु:ख झाले. मानवाकडून चूका होत राहतात. आजच्या अप्रिय घटनेसाठी मी केलेली सर्व कारवाई रद्द करतो. सकाळी ११ ते ११:४५ पर्यंतची संपूर्ण घटना विधानसभेच्या कामकाजातून वगळण्यात आली आहे‌.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा