पाकिस्तानात ट्रेनमध्ये भीषण स्फोट; २ ठार तर चौघे जखमी

33

पेशवार, १६ फेब्रुवारी २०२३ :पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी एका ट्रेनमध्ये भीषण स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बलुचिस्तान वरुन क्वेटाकडे जात असलेल्या जाफर एक्स्प्रेसमध्ये हा भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेसच्या इकॉनॉमी क्लासच्या बोगी क्रमांक ६ मध्ये हा स्फोट झाला असून, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून किमान चार जण जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कशाचा होता आणि कुणी केला याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून, जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, जाफर एक्स्प्रेसला महिनाभरात स्फोट होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी ३० जानेवारीला बलुचिस्तानमधील कच्छी जिल्ह्यातील माच परिसरात जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.