‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’वर कंगना राणौत संतप्त; पुरस्कारांवर नेपो माफियांचे नियंत्रण

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३ : अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल आपले स्पष्ट मत देत असते. आता कंगना राणौतने नुकत्याच झालेल्या ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२३’वर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीने ट्विट करून अवॉर्ड शोमध्ये नेपोटिझमचा आरोप केला आहे. कंगना याआधीही अनेकवेळा नेपोटिझमबद्दल बोलली आहे.

कंगनाने ट्विट करून लिहिले- ‘पुरस्कारांचा हंगाम सुरू झाला आहे आणि योग्य प्रतिभावंतांकडून सर्व पुरस्कार हिसकावून नेपो माफियाने पुन्हा वर्चस्व गाजवले आहे. येथे अशा काही लोकांची यादी आहे ज्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि कलात्मक प्रतिभेचे प्रदर्शन केले आणि २०२२ काबीज केले. सर्वोत्कृष्ट अभिनेता- ऋषभ शेट्टी (कंतारा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मृणाल ठाकूर (सीथा रामम).

नुकतेच मुंबईत ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२३’चे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी भाग घेतला होता. या अवॉर्ड शोमध्ये आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. अनुपम खेर यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर ऋषभ शेट्टीला कंतारा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रॉमिसिंग ॲक्टरचा पुरस्कार देण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा