UK Mcap Beat India: अदानी प्रकरणासह या कारणांमुळं ब्रिटनने बाजार भांडवलाच्या बाबतीत भारताला टाकलं मागं

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२३: गेल्या २ महिन्यांपासून जगभरातील शेअर मार्केट्स सातत्यानी पडत आहेत. त्यात भारतीय शेअर बाजार पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरीकीच्या फेड रिझर्वच्या वतीने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ करण्याचे संकेत मिळाल्याने अमेरिकी शेअर बाजारापाठोपाठ भारतीय शेअर बाजारात देखील मोठी घसरण दिसून आली. यामुळं बुधवारी बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स ६०,००० च्या खाली पोहोचला. निफ्टी ऑक्टोबर २०२२ पासून सर्वात खालच्या पातळीवर गेलाय. या काळात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १.५ टक्क्यांची घसरण झालीय, मात्र गेल्या चार ट्रेडिंग दिवसांतील घसरणीमुळं ब्रिटनने बाजार भांडवलाच्या (MCap) बाबतीत भारताला मागं टाकलंय.

यूके सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे इक्विटी मार्केट

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळं ब्रिटन आता भारताला मागं टाकत जगातील सहाव्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनलाय. २९ मे २०२२ रोजी म्हणजे सुमारे ९ महिन्यांत प्रथमच ब्रिटनने या बाबतीत भारताला मागं टाकण्यात यश मिळविलंय. जर आकड्यांनुसार समजलं तर, मंगळवारी ब्रिटनच्या प्रायमरी लिस्टिंगचे एकत्रित मार्केट कॅप ३.११ डॉलर ट्रिलियन पर्यंत वाढले होते. जे भारतापेक्षा ५.१ बिलियन अधिक आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ब्रिटिश चलन पौंड कमकुवत झाल्यामुळं ब्रिटनचा शेअर बाजार गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अधिक ताकदवान ठरत आहे. त्यामुळं ब्रिटनचा शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी अधिक कमाईचं कारण बनत आहे. स्मॉल आणि मिड-कॅप कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. ब्रिटनचा FTSE 350 निर्देशांक यावर्षी ५.९ टक्क्यांनी वाढलाय. ब्लू चिप FTSE १०० ने गेल्या आठवड्यात प्रथमच ८,००० चा टप्पा ओलांडला.

बीएसई-एनएसईची कमकुवत कामगिरी

यूके शेअर बाजाराच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराच्या निस्तेज कामगिरीमुळं गुंतवणूकदारांचं नुकसान होत आहे. गेल्या ४ ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचं ७ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. या ४ दिवसांत सेन्सेक्स १,५०० हून अधिक अंकांनी घसरलाय. बुधवारी घसरणीनंतर बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ३.९ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन २६१.३ लाख कोटी रुपयांवर आले.

अदानींच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने वाढल्या अडचणी

या वर्षी २०२३ मध्ये आतापर्यंत, एमएससीआय इंडिया निर्देशांकात ६.१ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी समूहाचे शेअर्स कमालीचे घसरले आहेत, ज्यामुळं समूहाचे मार्केट कॅप १४२ डॉलर अब्जांनी कमी झाले आहे. यामुळं परदेशी गुंतवणूकदारांची चिंता वाढली असून ते भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्याबाबत अधिक सावध होत आहेत. मात्र, सध्या चिंतेचे ढग केवळ अदानी समूहापुरतेच मर्यादित असल्याचं दिसत आहे. सध्या इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही.

एप्रिल-डिसेंबरमध्ये परकीय गुंतवणुकीत घसरण

एकूणच, २०२२-२३ हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी चांगलं वर्ष ठरलं नाही. परदेशी गुंतवणूकदारांना ब्रिटनचा शेअर बाजार अधिक आकर्षक वाटत असताना, भारतीय शेअर बाजारातील त्यांचा रस कमी होत आहे. त्यामुळं एप्रिल-डिसेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेतील विदेशी गुंतवणुकीचा आकडा १५ टक्क्यांनी घसरला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या नऊ महिन्यांत शेअर बाजारात ३६.७५ अब्ज डॉलरची एफडीआय आली आहे. तेच जरं इक्विटी मध्ये येणारी संपूर्ण एफडीआय बघितली तर ती एप्रिल-डिसेंबर २०२१ मधील ६०.४ अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर २०२२ मध्ये घसरून ५५ अब्ज डॉलर राहिली. म्हणजेच, सुमारे ८% ची घट नोंदवली गेली. ही FDI २०२०-२१ मध्ये १९ टक्क्यांनी वाढल्यानंतर २०२१-२२ मध्ये १ टक्क्यांनी कमी झाली.

विदेशी गुंतवणूकदार झाले सावध

डेरिव्हेटिव्ह शॉर्टने बुधवारी ६ वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श केला कारण FPIs चे स्टेक वाढले. निफ्टी आणि बँक निफ्टीमधील फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची होल्डिंग ४४७,५९३ करारांवर पोहोचली. याआधी, डेरिव्हेटिव्ह शॉर्टची मागील सर्वोच्च पातळी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीनंतर झाली होती, जेव्हा हा आकडा ५१२,५३५ हजारांवर होता. याचे कारण अदानी संकटासोबतच चीनमधील अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्याचे मानले जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा