फलटण (जि. सातारा), ८ मार्च २०२३ : समाजातील महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येऊन समाजात उत्तुंग प्रगती करावी. समाजाला महिलांची नितांत गरज आहे. कारण महिला समाजाचा कणखर कणा व मजबूत पाया म्हणून स्थिर राहू शकतात, असे अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष प.पू. आचार्य श्यामसुंदर शास्त्री विद्वांस यांनी सांगितले.
जागतिक महिलादिनानिमित्त बुधवारी (ता. ८) श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, दक्षिण काशी व सुयश लॅब, फलटण यांच्या वतीने आबासाहेब मंदिर, फलटण येथे महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरात १५० महिलांची तपासणी करण्यात आली.
महानुभाव पंथात महिलांचा मानसन्मान हा १२ व्या शतकापासून भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केल्यापासून होतोय. स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जातेय, असे महाराष्ट्र राज्य आडतदार संघटना कार्याध्यक्ष बाळासाहेब ननावरे यांनी सांगितले.
सुयश लॅबच्या वतीने महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आल्या. काही चाचण्या असतील त्या लॅबमध्ये मोफत केल्या जातील, असे डॉ. दिव्या विक्रांत रसाळ यांनी सांगितले.
यावेळी डॉ. विक्रांत रसाळ, डॉ. दिव्या रसाळ व सहकारी यांनी तपस्विनी, साधू-संत यांच्यासह इतर महिलांची आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक माहिती दिली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार