दिल्ली मध घोटाळाप्रकरणी तेलंगणाच्या के. कविता यांची ‘ईडी’कडून आज चौकशी

तेलंगाना, ११ मार्च २०२३ : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना ‘ईडी’ने तीन दिवसांपूर्वी समन्स बजावले होते. दिल्ली मध घोटाळाप्रकरणी भारत राष्ट्र समिती नेत्या के. कविता यांची आज ‘ईडी’कडून चौकशी करण्यात येणार असून, त्या आज ‘ईडी’ला सामोरे जाणार आहेत. कविता दक्षिणेतील मध कार्टेलचा प्रमुख भाग असून, मध घोटोळ्यात त्यांनी मोठा फायदा मिळवला असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला असून या प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते.

‘ईडी’ने बजावलेल्या समन्सवर बोलताना के. कविता यांनी तपासात मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. ‘ईडी’ने मला ९ मार्चला नोटीस बजावली होती. मी १६ मार्चला हजर राहण्यासाठी अर्ज केला होता; पण ‘ईडी’ला काय घाई आहे माहीत नाही. म्हणून मी आज ११ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्यास होकार दिला असल्याचे म्हटले आहे; तसेच गेल्या जूनपासून भारत सरकार सतत तेलंगणात तपास यंत्रणा पाठवत आहे.

दरम्यान, ‘ईडी’ने बजावलेल्या समन्सवर प्रतिक्रिया देताना के. कविता यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून, कायदेशीर सल्ला घेत असल्याचे म्हटले आहे. तपास संस्थांना सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच केंद्रातील सत्ताधारी लोक विरोधी पक्षांना धारेवर धरत, तपास संस्थांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप कविता यांनी केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा