नवी दिल्ली, १७ मार्च २०२३: जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर परदेशात जाण्याऐवजी अंतराळ प्रवासाची तयारी करा. अंतराळ जाऊन पर्यटन करणे हे खरतर स्वप्नासारखे आहे. येत्या भविष्यात ते प्रत्यक्षात येईल याची इस्रोने खात्री केली आहे. इस्रोने तुम्हाला अवकाशात फिरायला नेण्याची योजना आखली आहे.
अंतराळ पर्यटनाची तयारी करत असलेले इस्रो २०३० सालापर्यंत तुम्हाला अंतराळाच्या सहलीला घेऊन जाण्यास सुरुवात करेल. म्हणजेच येत्या काही वर्षात तुम्हाला अवकाशाबद्दल फक्त वाचायला आणि ऐकायला मिळणार नाही, तर तिथं जाऊन तुम्हाला ते जवळून पाहता येईल, अनुभवता येईल. विज्ञानामुळे तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. २०३० पर्यंत स्पेस सूट, बोर्ड रॉकेट घालून अंतराळात प्रवास करणे शक्य होईल.
अंतराळ पर्यटनाच्या दिशेने भारत वेगाने काम करत आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी इस्रोने ही योजना तयार केली आहे. ते जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंतराळ पर्यटनासाठी खासगी कंपन्यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले. त्यांच्या मदतीने ते पूर्ण होईल. हा प्रवास पूर्णपणे सुरक्षित असेल. अंतराळ प्रवासासाठी तुम्हाला 6 कोटी रुपये खर्च करावे लागतील.
मात्र, अंतराळ पर्यटन हे अंतराळाच्या काठापर्यंत असेल की अवकाशाच्या कक्षेपर्यंत असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्ल्यू ओरिजिन, व्हर्जिन गॅलेक्टिक आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्या स्पेस टूरवर काम करत आहेत. आता इस्रोही या क्षेत्रात उतरले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी: केतकी कालेकर