प्रधानमंत्री आवास योजनेतील टेंडर घोटाळा प्रकरणात छत्रपती संभाजीनगर शहरात ईडीची छापेमारी

8

छत्रपती संभाजीनगर: १७ मार्च २०२३ शहरात आज सकाळपासूनच ईडी कडून नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याचं माहिती समोर आली आहे. ही छापेमारी महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टेंडर घोटाळा प्रकरणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. आज सकाळीच तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, त्यानंतर आणखी नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चाळीस हजार घरांसाठी चार लाख कोटी रुपयांची प्रकल्प उभारण्यात येणार होता. यामध्ये समरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी देखील निविदा भरली होती. मात्र,यात निविदा एकाच आयपीवरुन भरण्यात आल्याचं उघडकीस आले होते. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा या सर्वांवर आरोप आहे.यात आता ईडी कडून छापेमारी करण्यात येत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी: विनोद धनले