ट्विटरने पाकिस्तान सरकारचे भारतातील खाते केले बंद

12

पुणे, ३१ मार्च २०२३: कायदेशीर मागणीला प्रतिसाद देत पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. खात्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, “कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून @GovtofPakistan चे खाते भारतात रोखले गेले आहे” असा संदेश दर्शवेल.

पाकिस्तानचे ट्विटर अकाउंट भारतात पाहण्यावर बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात रोखण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. हे खाते यापूर्वी जुलैमध्येही रोखण्यात आले होते परंतु ते पुन्हा सक्रिय करण्यात आले होते आणि ते दिसत होते.

कायदेशीर मागणीनंतर पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंटवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर ट्विटरने भारतात त्याचा प्रवेश अवरोधित केला आहे. मागणीनंतर, मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन मानून ते ब्लॉक केले. या कारवाईमुळे पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतातील लोकांना दिसत नाही. गेल्या वर्षी जून २०२२ मध्ये, ट्विटर इंडियाने संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासाचे ट्विटर खाते ब्लॉक केले होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर