आयपीएल मध्ये बंगळुरुचा मुंबईवर दणदणीत विजय

बेंगळुरू, ३ एप्रिल २०२३: चिन्नास्वामी स्टेडियमवर तीन वर्षांनंतर आयपीएलचं पुनरागमन झालंय. २०१९ नंतर प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्याने घरच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी नवीन आशा निर्माण केल्या आहेत. कर्णधार फाफ डुप्लेसी, माजी कर्णधार विराट कोहली यांची सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बंगळुरूने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ८ विकेट्स राखून पराभव केला. या सहज विजयासह आरसीबीने पहिल्या विजेतेपदाच्या शोधात दमदार सुरुवात केली.

गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जने या वर्षी आपापल्या घरात सुरुवात केली आणि विजय मिळवला. या टास्कमध्ये फक्त सनरायझर्स हैदराबाद अपयशी ठरले. अशा स्थितीत पाचवेळच्या चॅम्पियन मुंबईचा सामना करणाऱ्या बेंगळुरूकडं डोळे लागले होते. बंगळुरूनेही निराश न होता घरच्या मैदानावर दणदणीत विजयासह वर्षाची सुरुवात केली. त्याचवेळी, सलग ११व्या वर्षात मुंबईला पहिला सामना जिंकता आला नाही.

आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिस सुरुवातीपासूनच आक्रमक दिसला आणि त्याने अवघ्या २९ चेंडूत आपल अर्धशतक पूर्ण केलं. १५व्या षटकात डुप्लेसी बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७३ धावा ठोकल्या. आणि ३ सीझननंतर चिन्नास्वामी येथे आरसीबी चाहत्यांसमोर खेळणाऱ्या कोहलीनेही प्रेक्षकांची निराशा केली नाही. आरसीबीच्या माजी कर्णधाराने आपले अर्धशतक ३८ चेंडूत पूर्ण केलं आणि शेवटपर्यंत टिकून राहिला. १७व्या षटकात षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. कोहली ४९ चेंडूंत ६ चौकार, ५ षटकारांसह ८२ धावा करून नाबाद परतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा