मविआने उद्धव ठाकरेंना प्रमुख नेते दर्शवल्याने भाजपच्या वाढू शकतात अडचणी

मुंबई, ४ एप्रिल २०२३: महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळं वळण घेतंय. भाजपविरोधातील प्रचारात, महा विकास आघाडीने (MVA) रविवारी छत्रपती संभाजी नगरमध्ये पहिला संयुक्त मेळावा घेतला. या रॅलीत सुमारे एक लाख लोक सहभागी झाले होते. या सभेसाठी पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे, विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह ‘मविआ’चे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला आदर.

ठाकरे यांचा मविआचा नेता म्हणून उदय ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती असल्याचं दिसतं. काँग्रेस टिकण्यासाठी संघर्ष करत आहे, राष्ट्रवादीची विश्वासार्हता फारच कमी आहे. अशा स्थितीत मतदारांकडून सहानुभूतीची अपेक्षा असलेले उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतात.

भविष्यातील निवडणुका युती म्हणून लढवण्याचा एमव्हीएचा विचार आहे. गेल्या महिन्यात पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत त्यांच्या एकजुटीने २७ वर्षांनी भाजपकडून जागा हिसकावून घेतली. मविआ कायम राहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला आपल्या शानदार कामगिरीची पुनरावृत्ती करणं कठीण जाईल, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल देऊ शकते. ठाकरे यांचं भवितव्य ठरवण्यातही हा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा