नवी दिल्ली, ५ एप्रिल २०२३: ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्तीवर झालेल्या हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जावा अथवा त्यांना पदावरून हटविले जावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदीं यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे.
ठाण्यातील प्रकरणाच्या अनुषंगाने राज्याच्या गृह मंत्र्यांच्या भूमिकेबाबत अहवाल मागविण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांवरील अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही आपण अमित शहा यांच्याकडे केली आहे. असे चतुर्वेदीं यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे सोडून पोलिस पीडित महिलेलाच प्रतरित करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री प्रत्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांना पदावरून हटविणे, व तातडीने राजीनामा घेणे हे सध्याच्या परिस्थितीत योग्य ठरणार आहेअशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर