“आगे आगे देखो होता है क्या”, करण जोहर वरील टीकेवर कंगनाची प्रतिक्रिया

10

मुंबई,१० एप्रिल २०२३: “लगा लो इल्जाम… हम झुकनेवालो मे से नही, झुट का बन जाओ गुलाम, हम बोलने वाले मे से नही, जितना नीचा दिखाओगे, जितना आरोप लगाओगे, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठालो तलवार, हम मरने वाले मे से नहीं|” हा कोणत्याही चित्रपटातला डायलॉग नाही. दिग्दर्शक करण जोहर याच्यावर टीका करणाऱ्यांना त्याचे उत्तर आहे. या टीकेला कारण ठरले ती त्यांनी दिलेली एक कबुली. नेपोटिझम वर भाष्य करत असताना अनुष्का शर्माचा करिअर संपवणार होतो अशी कबुली करण जोहरने सार्वजनिक कार्यक्रमात दिली. त्यामुळे करण जोहर अडचणीत सापडला.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सिने कलाकारांच्या पुढील पिढीला चित्रपटसृष्टीत आणण्याचे श्रेय करण जोहरला दिले जाते. आलिया भट, वरून धवन, जानवी कपूर यांसारख्या यशस्वी कलाकारांना करण जोहरच्या सिनेमांनी ओळख मिळवून दिली आहे. परंतु अनुष्का शर्मा वर केलेल्या भाषाणा मुळे त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रा ने देखील तिला कॉर्नर करत आहेत असे सांगितले तर आता बॉलीवूड क्वीन कंगना राणावतही फॉर्म मध्ये आली आहे. नेपोटिझम आणि विशेष म्हणजे करण जोहर या दोन्ही मुद्द्यांवर बोलणं कंगना कधीही सोडत नाही. या विषयांवर नेहमीच ती तिची मतं मांडताना दिसते.

करण जोहर वर सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून त्याने त्याच्या इन्स्टा हँडल वरून एक कविता शेअर केली. त्याच कवितेचा स्क्रीनशॉट पोस्ट करत कंगनाने एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या स्टोरीमध्ये ती म्हणते,” एक वेळ अशी होती जेव्हा चाचा चौधरी ईलाईट नेपो माफियांबरोबर मिळून नॅशनल टेलिव्हिजनवर मला इंग्रजी बोलता यायचं नाही म्हणून माझी खेचायचे आणि अपमान करायचे. आज यांची हिंदी पाहून वाटलं आता तर फक्त तुझी हिंदी सुधारली आहे पुढे बघा काय काय होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे