रंगतदार सामन्यात मुंबईचा दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर विजय

दिल्ली, १२ एप्रिल २०२३ : अरुण जेटली स्टेडियम वर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला. पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या सुरेख गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सने पराभव केला. दिल्लीचा सलग चौथा पराभव आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या. तिलक वर्मा ४१ आणि ईशान किशनने ३१ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सच्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितला टिलक वर्माचीही चांगली साथ मिळाली आणि दोघांनीही पुढच्या ८ षटकात ६८ धावा ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला. त्यानंतर १६व्या आणि १७व्या षटकात सामन्याला गती मिळाली. मुकेश कुमारच्या षटकात टिलक वर्माने सलग ३ चौकारांसह १६ धावा ठोकल्या पण पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. आणि पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा गोल्डन डकचा विकेट ठरला.

पुढच्याच षटकात यष्टीरक्षक अभिषेक पोरेलने रोहितचा जबरदस्त झेल घेतला. मात्र, इथून टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनने संघाला विजयाकडे नेले. दिल्लीने शेवटच्या षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. १८व्या षटकात वेगवान गोलंदाज एनराकी नोरखियाने केवळ ६ धावा दिल्या, परंतु १९व्या षटकात ग्रीन आणि डेव्हिडने प्रत्येकी एक षटकार ठोकला आणि मुंबईने शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत ४ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावांचा पाठलाग पूर्ण केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा