शेतात कांदा काढताना मिळाली पती पत्नीला आनंदाची बातमी; एकाच वेळी झाले पोलिस भरती

शिरूर, १३ एप्रिल २०२३: चांहोड येथील शेलार कुटुंबातील पती तुषार आणि पत्नी भाग्यश्री हे शेतकरी जोडपं एकाच वेळी पोलिस भरती झाले आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे दांपत्य एकाच वेळी भरती झाले. काही झालं तरी पोलीस दलात भरती व्हायचंच या जिद्दीपोटी अथक प्रयत्न आणि कुटुंबाने प्रोत्साहन दिल्यानं त्यांना आनंदाची बातमी समजली. अखेरची मेरिट लिस्ट लागल्याने त्यात प्राविण्य मिळवून या नवरा बायकोचा यात नंबर लागला. त्यावेळी या शेतकरी कुटूंबात आनंदाचे अश्रू पहावयास मिळाले.

पोलीस दलात भरती व्हायचं असा निश्चय तुषार आणि भाग्यश्रीने केला होता. त्यांना दोघांना पोलीस भरतीचे वेध लागले होते. त्यासाठी तुषार आणि भाग्यश्रीने बरोबरीने गेली चार वर्षे खुप कष्ट घेतले. दररोजचा व्यायाम शिवाय घर आणि शेतातलं काम याला फाटा देऊन या जोडप्याने फक्त पोलीस भरतीवर लक्ष ठेवलं होतं. वेळ प्रसंगी घरातील अडचणीवर मात करत कुटुंबाच्या खंबीर साथीने त्यांनी हे यश प्राप्त केलंय.

कुटुंबातील सर्व सदस्यांचं पाठबळ, खंबीर साथ, आशिर्वाद पाठीशी असल्यानं एकाचवेळी पतीपत्नी म्हणून पोलिस भरतीत यश प्राप्त झालंय. सामाजिक बांधिलकी जपत मिळालेल्या संधीचं यापुढील काळात सोनं करण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया भाग्यश्री आणि तुषार शेलार या दाम्पत्याने दिलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा