अमृतसर-पाक सीमेजवळ आढळला हिरॉईन आणि अफू घेऊन जाणारा ड्रोन

अमृतसर, २७ एप्रिल: सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने एका पाकिस्तानी ड्रोनला गोळी मारून पाडले जो उघडपणे भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता. तो ड्रोन पंजाबच्या अमृतसरमधील धानोई कलान गावाजवळ हिरॉईन आणि अफूची पाकिटे घेऊन जात असल्याच बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसलेल्या संशयित ड्रोनचा कर्कश आवाज ऐकला आणि सैन्याने त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. गोळीबार करून ड्रोनला रोखण्यात आले.

बीएसएफ पंजाब फ्रंटियरने माहिती दिली की या भागाच्या प्राथमिक शोधादरम्यान, बीएसएफच्या जवानांना तो काळ्या रंगाचा ड्रोन अर्धवट तुटलेल्या अवस्थेत सापडला. बीएसएफने सांगीतले की त्यात पिवळ्या टेपने गुंडाळलेले एक मोठे पॅकेट होते, ज्यामध्ये हिरॉइनची दोन पॅकेट आणि अफूची दोन लहान पाकिट होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिरॉईनच्या दोन पॅकेटचे वजन २ किलोग्रॅम आणि अफूचे सुमारे १७० ग्रॅम होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा रक्षक दलाने केलेल्या शोध मोहिमेदरम्यान तो सापडला. हा ड्रोन पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसला आणि अमृतसर सेक्टरमधील बॉर्डर आउटपोस्ट राजाताल परिसरात आढळून आला. तत्पूर्वी, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी २ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २.३० च्या दरम्यान अमृतसर सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी ड्रोन पाडले.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा