पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून १४ जणांचा मृत्यू

7

पश्चिम बंगाल, २८ एप्रिल २०२३: पश्चिम बंगालमध्ये काल झालेल्या विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर काही जिल्ह्यात वीज देखील पडली आहे. दरम्यान येथील पाच जिल्ह्यांत वीज कोसळल्याने यामध्ये जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आपत्ती व्यवस्थापणाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात चार आणि मुर्शिदाबाद आणि उत्तर २४ परगणा येथे प्रत्येकी दोन अशा एकूण आठ जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मिदनापूर आणि हावडा ग्रामीण जिल्ह्यात प्रत्येकी तीन अशा एकूण सहा जणांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेकजण शेतकरी होते. हे सर्वजण शेतात काम करत असताना अचानक सुरू झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे वीज कोसळून या सर्व १४ जणांचा मृत्यू झाला. असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे प्रत्येक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर