इन्स्टाग्रामवर दररोज 2 अब्जांहून जास्त वेळा रील्स होतात शेअर, सोशल मीडियावर टाइम स्पेन्ट २४% वाढला.

कॅलिफोर्निया, २९ एप्रिल २०२३: मेटाने आपल्या प्लॅटफॉर्मचे २०२३ मधील पहिल्या तिमाहीचे रिझल्ट नुकतेच जाहीर केले. या रिझल्ट बाबत झुकरबर्ग यांनी फेसबूक व इन्स्टाग्राम वरच्या पब्लिक एंगेजमेंटविषयीची माहिती सांगितली. यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) द्वारे बनवलेल्या रील्समुळे इन्स्टाग्रामवर लोकांचा टाइम स्पेन्ट २४% टक्क्यांनी वाढला आहे.

मेटाने टिकटॉकच्या कॉम्पिटिशनमध्ये रील्स जेंव्हापासून लॉन्च केले आहे, तेव्हापासून इन्स्टाग्रामवर लोकांचा टाइम स्पेन्ट वाढला आहे. फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर बनवल्या जाणाऱ्या रील्स ची संख्या वेगाने वाढत आहेत. या रील्स दररोज २ अब्जांहून जास्त वेळ शेअर केल्या जातायत. हा आकडा गेल्या ६ महिन्यांत दुप्पट झाला आहे.

यात भर म्हणजे इन्स्टाग्रामने आता नवे फीचर आणले आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या बायोत ५ लिंक अॅड करण्याची सुविधा या फिचर द्वारे देण्यात आली आहे. या आधी युझर्स त्यांच्या बायोत केवळ एकच लिंक अॅड करू शकत होते. फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर बनवल्या जाणाऱ्या रील्स च्या जबरदस्त परफॉर्मन्स ने, शॉर्ट व्हिडीओ ऍप सेगमेंट मध्ये मेटा ची मक्तेदारी वाढल्याचे झुकरबर्ग यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा