महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी, तीन नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान

गडचिरोली, १ मे २०२३: महाराष्ट्रातील गडचिरोली येथे काल सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. चकमकी नंतर जंगलातून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर जवानांनी ही प्रत्युत्तरात गोळीबार केला. मात्र तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर ३८ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. गडचिरोलीतील अहेरी भागात ही चकमक झाली. ज्यामध्ये ३ नक्षलवादी ठार झाले आहेत.

पोलिसांनी काल ३८ लाखांचे बक्षीस असणाऱ्या तीन नक्षल्यांचा चकमकीत खात्मा केला. पोलिस भरतीसाठी गेलेल्या साईनाथ नरोटेची हत्या १० मार्च रोजी या नक्षल्यांनी केली होती. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, काल संध्याकाळच्या सहाच्या सुमारस पोलिसांना नक्षल्यांचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. आणि यावेळी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार केले. बेटलू मडावी हा नक्षलवादी देखील यात मारला गेला.

या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, यापूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सीमेवर कमांडो आणि स्थानिक पोलीस सतर्क आहेत. ही चकमक संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान झाली. ज्यामध्ये ३ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळताच उर्वरित नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांकडून जंगलात शोधमोहीम सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा