आगामी निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चीत करु, देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

गडचिरोली, ३ मे २०२३: राज्यात निवडणूका झाल्या तर विरोधकांना चारी मुंड्या चीत करु, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आव्हांनाला सडेतोड उत्तर दिले. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र दिनापासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काळ सकाळी त्यांनी पोलिस विभागाच्या विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

हिंमत असेल तर निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी निवडणूका लवकरच होतील आणि त्यात विरोधकांना चारी मुंड्या चीत करु, असे सांगून ठाकरे यांच्या आव्हांनातील हवाच काढून घेतली आहे.

कोकणातील बारसू रिफायनरी सुरू करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनीच आधी पत्र दिले होते. आता ते विरोध करु लागले आहेत. यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. हा विरोध स्थानिकांचा नसून, बाहेरच्या लोकांना बोलावून विरोध केला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. वारंवार आंदोलन करुन विरोध करणाऱ्या नेत्यांवर आमची नजर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा