श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे कुष्ठरोगी बांधवांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि संत सोपानदेव देवस्थानला पालखी साठी १० लाखांची मदत

पुणे ५ मे २०२३: डॉ.जाल मेहता मेमोरिअल अपंग उद्धार औद्योगिक सहकारी संस्था येथील कुष्ठरोगी बांधवांसाठी मदत म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. कुष्ठरोगी बांधवांना आत्मनिर्भर करण्याकरिता, मशीन खरेदी करून त्यानां स्वतःचा रोजगार निर्माण करणे कामी ट्रस्टने ही मदत दिली आहे. येवलेवाडीमध्ये ४०० कुटुंब या कामाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होत आहेत.

सासवड येथील श्री संत सोपानदेव देवस्थानने चांदीची पालखी साकारण्याचा संकल्प केला होता, ही चांदीची पालखी साकारण्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने ५ लाख रुपयांची मदत देवस्थानाला दिली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आरोग्यसेवेच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य कार्य सुरु आहे. ससून रुग्णालयामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचा उपक्रम, पालखी मार्गांवर फिरत्या रुग्णवाहिका व पाण्याचे टँकर असे उत्तम आरोग्यविषयक उपक्रम सुरु आहेत. आता डोळ्यांच्या तपासणीसाठी विशेष रुग्णवाहिका सुविधा केल्याने कष्टकरी वर्गाचे आरोग्यविषयक प्रश्न सुटणार आहेत. असे संत सोपानदेव देवस्थानाचे त्रिगुण महाराज गोसावी यांनी सांगितले.

यावेळी डोळ्यांच्या तपासणीकरिता भारतीय स्टेट बँक प्रशासनिक कार्यालय पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या आधुनिक उपकरणांनी युक्त असलेल्या ट्रस्टच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी मान्यवरांसह नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा