मुलांना शिकवताय मग… स्वार्थीपणा नको!

मूल २-३ वर्षांचे झाले कि लगेच आई वडिलांना चाहूल लागते ती त्याने शाळेत जायची. मूल शिकायला हवं, अभ्यासात हुशार हवं हि अपेक्षा ठेवणं काही गैर नाही. मात्र ते अमुक एक वय धरून व्हायला हवं हि अपेक्षा ठेवणं चूक आहे.

प्रत्येक मूल खास आहे हे जसं अगदी प्रगल्भपणे आजकाल बोललं जाते. त्याचप्रमाणे हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा कि प्रत्येक मूल वेगळं आहे.
प्रत्येक मूल आपापल्या वेळेनुसार वाढ साधत असतं. अमुक एक मूल जर अमुक एका वयात चालायला शिकतं, बोलायला शिकतं तर हि अपेक्षा करणं किती योग्य आहे कि आपल्या मुलाने देखील त्याच वयात त्या गोष्टी करायला शिकायला हवं.
अमुक एका वयात त्याने शाळेत जायला हवं, किंवा अभ्यास करायला हवा या अपेक्षा त्याच्यावर लादणं किती योग्य आहे?
अनेकदा पालक आपल्या पाल्याला बळजबरीने शाळेत घालतात, त्यांना रडवत शाळेत पाठवतात, अर्ध्या झोपेत असताना अनेक लहान मुलं शाळेच्या गाडीत बसतात.
एक दोन वर्षाच्या मुलांसाठी व्यवस्थित झोप होणं, त्यांना भूक लागलेली कळणं, वेळेवर पोट साफ होणं या गोष्टी वाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. याकडे खरंच आपण लक्ष देतो का? आणि नाही तर याचे दूरगामी परिणाम किती वाईट असू शकतात याचा आपण विचार करायला हवा.
बाकीच्या गोष्टी होतीलही मात्र त्यांना मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी तुमची गरज असते सुरवातीच्या काळात. मूल चार वर्षांचं झाल्यांनतर त्याला शाळेत घालण्याचा विचार करणं योग्य असतं.
तेव्हा त्याला भूक, शी, सु, त्याचं नाव, पत्ता, निदान इतक्या तरी गोष्टी सांगता येतात. त्यानंतरच बाकीच्या गोष्टी ते आत्मसात करण्याच्या मनस्थितीत येतात. त्यामुळे त्याच्या मानसिक गरजांचाच आधी व्हायला हवा.
नाहीतर जितक्या लवकर शाळेची गोडी लावण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तेवढ्या लवकर ते मूल शाळेला कंटाळेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा