आयपीएल मध्ये मुंबईचा गुजरातवर २७ धावांनी विजय

मुंबई, १३ मे २०२३: वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या (१०३) पहिल्या आयपीएल शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने टेबल टॉपर्स गुजरात टायटन्सचा २७ धावांनी पराभव केला. सूर्यकुमारच्या शतकाशिवाय आकाश मधवालच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने गुजरातवर हा मोठा विजय नोंदवला. रशीद खानची (नाबाद ७९) धडाकेबाज खेळीही हा पराभव टाळू शकली नाही.

वानखेडे स्टेडियमवर गेल्या काही सामन्यांमध्ये सलग २०० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा २०० धावांचा टप्पा पार केला. यावेळी संघाने प्रथम फलंदाजी करत २१८ धावा केल्या. वानखेडेवर धावांचा पाऊस पाहता गुजरातकडूनही अशीच जोरदार अपेक्षा होती, मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले.

जसप्रीत बुमराह कदाचित नसेल, जोफ्रा आर्चर फारसे योगदान न देता परतला, परंतु मुंबईने त्यांची अनुपस्थिती युवा गोलंदाज आकाश मधवाल आणि अनुभवी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ यांनी भरून काढली. चौथ्या षटकातच वृध्दिमान साहा व शुभमन गिल आणि त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र विजय शंकरने काही धावा केल्या, पण पियुष चावलाने त्याला पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले. पुढच्याच षटकात अभिनव मनोहरला कुमार कार्तिकेयने बोल्ड केले. एकूण ७.१ षटकात केवळ ५५ धावांत ५ विकेट पडल्या.

येथून डेव्हिड मिलरने ४१ धावा करून गुजरातच्या काही आशा उंचावल्या होत्या. मात्र आकाश मधवालने त्याला १२व्या षटकात बोल्ड केले. १४व्या षटकापर्यंत गुजरातची धावसंख्या ८ बाद १०३ धावांवर होती आणि पराभव ही निश्चित होता. असे असूनही राशिद खानने हार मानली नाही. गुजरातच्या या अनुभवी खेळाडूने धमाकेदार खेळी करत अवघ्या २१ चेंडूत पहिले अर्धशतक झळकावले आणि मुंबई इंडियन्सने टेबल टॉपर्स गुजरात टायटन्सचा २७ धावांनी पराभव केला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा