नवी दिल्ली, १५ मे २०२३: रोजगार मेळावा मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी देशभरातील ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे. पोस्ट कार्यालयातील पोस्ट सेवक, इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट या पदांबरोबरच विविध खात्यांतील तिकीट क्लार्क, कनिष्ठ क्लार्क कम टायपिस्ट, कनिष्ठ अकाउंटस क्लार्क, ट्रँक मेटेनर, असिस्टंट ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लार्क, उपविभागीय अधिकार, कर सहाय्यक आदी पदांसाठी ही नियुक्तीपत्रे दिली जातील.
सरकारी खाती आणि मंत्रालयांमध्ये युवकांना रोजगार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडून मागील काही काळापासून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत दहा लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. रोजगार मेळाव्याचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना आभासी माध्यमातून मार्गदर्शनही करणार आहेत. देशातील एकूण ४५ ठिकाणी हा रोजगार मेळावा होणार आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर