पुणे, १६ मे २०२३ -: विधानसभा अध्यक्ष्यांकडे ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खरे सांगायचे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे. परंतु तसे जाहीर केले जात नाहीये. तसे जाहीर केले तर लोक ठाकरे गटाकडे थांबणार नाहीत. त्यामुळे ते वारंवार विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे, ते पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.
मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिला, हा निकाल देताना १६ अपात्र आमदारांबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. यानंतर सोमवारी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असताना, विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेण्यात आली.
विधानसभा अध्यक्ष विदेशात असल्याने अपात्रतेबाबत आपण निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे. तुमची बाजू कमकुवत असल्यामुळे तुम्ही अशा धमक्या देत आहात.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर