बंगळूरला वळवाचा जोरदार तडाखा; शहर जलमय, तर अभियंता तरुणींचा मृत्यू

बंगळूर, २२ मे २०२३: वळवाच्या पावसाने रविवारी बंगळूर शहराला जोरदार झोडपल्याने रस्ते जलमय झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. तर अनेक ठिकाणी वाहने पाण्यात बुडाली. अशाच एका वाहनात अडकून एका सॉफ्टवेअर अभियंता तरुणींचा मृत्यू झाला आहे. भानूरेखा (वय २२,रा. आंध्र प्रदेश) असं त्या तरुणींचे नाव आहे. तर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात काल दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका होता की, काही वेळातच संपूर्ण शहर जलमय झाले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक वाहने अडकून पडली. पाण्यातून जाताना एक कार खड्ड्यात गेल्याने कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

तर दुसऱ्या घटनेत एका भुयारी मार्गातून चाललेली एक कार पाण्याचा जोर वाढल्याने बुडाली. कारमधील तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पावसामुळे तरुणींचा मृत्यू झाल्याचे समजताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयाला भेट देऊन तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आणि सरकारकडून पाच लाखांची मदत तातडीने दिली जाईल. यापुढे शहरात कोणत्याही ठिकाणी पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना आखण्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा