सोलापूर, २८ मे २०२३: महापालिकेच्या आवारातील ११० वर्षांच्या हेरिटेज वास्तूचे नूतनीकरण केल्यानंतर या वास्तूचे सौंदर्य आणखीन खुलले आहे. या इमारतीमधील हॉलमध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर, चार हुतात्म, गिरण्या आदींचे चित्रे रंगवून सोलापूरचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जे नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
नूतनीकरण केलेल्या इंद्रभुवन इमारतीचे लोकार्पण नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. आता ही वास्तू जनतेसाठी खुली झाली आहे. या इमारतीचे नूतनीकरण स्मार्ट सिटीच्या सुमारे पाच कोटींच्या खर्चातून झाले आहे. या इमारतीला मूळ रूप देण्यात आले आहे. सरनक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनी मार्फत हे नूतनीकरण करण्यात आले आहे.
कंझर्वेशन आर्किटेक्चर मुनीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० कारागिरांनी यासाठी परिश्रम घेतले. या इमारतीवर आकर्षक विधुतरोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन घडत आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गत सौंदर्य प्राप्त करून दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर