बीएसएफने रोखला हेरॉईन वाहून नेणारे पाकिस्तानी ड्रोन, ३.२ किलो हेरॉईन केले जप्त

अमृतसर, ५ जून २०२३ : सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानचे ड्रोन पाडले आणि तीन किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले. रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास ड्रोन दिसल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी तातडीने त्यावर गोळीबार करून त्याला रोखले.

बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, या भागात शोध घेत असताना बीएसएफच्या जवानांनी अमृतसरमधील रत्तनखुर्द गावात एका शेतातून काळ्या रंगाचा ड्रोन हेरॉइनच्या तीन पॅकेटसह जप्त केला. अटारी-वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानचा ड्रोन पाडला त्यात साधारण ३.२ किलो हेरॉईन होते.

पाकिस्तानी ड्रोन घुसखोरीचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतीय हवाई हद्दीचे ड्रोन द्रारे वारंवार उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी ड्रोन सीमा ओलांडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सीमा सुरक्षा दलानी शनिवारी पंजाबमधील अमृतसरमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन पकडून ५ किलोग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइन जप्त केले. सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने ते हेरॉईन जप्त केले. गेल्या २ दिवसात बीएसएफने ४ ड्रोन हाणून पाडले.

त्याआधी बीएसएफने रविवारी पंजाबमधील अमृतसर सेक्टरमध्ये भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला रोखले आणि पाडले. बीएसएफच्या जवानांनी ड्रोन आणि बांधलेले आमली पदार्थ देखिल जप्त केले होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा