संरक्षण, स्वच्छ इंधनासह अंतराळ क्षेत्रांतील तांत्रिक सहकार्यावर भर: भारत-अमेरिकेचा निर्धार

नवी दिल्ली, ५ जून २०२३: संरक्षण, स्वच्छ इंधन तसेच अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्याचा निर्धार भारत-अमेरिका यांनी केला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांची भेट घेत चर्चा केली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत देशातच जास्तीत जास्त संरक्षण साहित्यांची निर्मिती करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाची देशाला गरज आहे. सध्या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्यांची खरेदी करतो. मुक्त आणि सुरक्षित भारत- पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका सध्या जगभरात लाँबिग करीत आहे. चीनपासूनचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या मोहिमेत पुढाकार घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २२ तारखेपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी ऑस्टिन यांचा दौरा होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. अति उंचीवर उपयोगत येणाऱ्या विनामाणूस टेहेळणी विमानांच्या खरेदीचा सौदा या दौऱ्यावेळी होऊ शकतो. अशी सुत्रांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा