बाणेर: वासुंधरा अभियान बनेर या संस्थेतर्फे तुकाई टेकडीवर रविवारी दिनांक आठ रोजी शालेय मुलांच्या मार्फत १००१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. बाणेर मधील तुळजाई टेकडीवर वसुंधरा संस्थेमार्फत पर्यावरण पूरक असे कार्यक्रम घेतले जातात. जैवविविधता टिकून राहावे म्हणून पर्यावरणावर आधारित वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन या संस्थेमार्फत केले जाते. वृक्षांना पाणीपुरवठा करण्यासाठी या टिकलीवर संस्थेमार्फत सव्वीस टाक्या बांधण्यात आल्या आहे. तसेच आज पर्यंत लोकांच्या मार्फत तेवीस हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड येथे करण्यात आली आहे.
अभिनेते व सह्याद्री देवराई चे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. केवळ एक तासात एक हजार एक झाडे लावण्याचा कार्यक्रम येथे करण्यात आला. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी झाड लावले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव त्या झाडाला देण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या झाडाचे संगोपन करू शकेल. यावेळी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व मुलांना सयाजी शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.