गॅगस्टर संजीव जीवाच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव

26

नवी दिल्ली, ८ जून २०२३: कुख्यात गॅगस्टर संजीव जीवा यांची लखनऊ न्यायालयात हत्या करण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी पायल माहेश्वरीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करीत त्यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने सहमती दर्शवत उत्तर प्रदेश सरकारला प्रत उपलब्ध करवून देण्याचे आदेश दिले आहेत.

उधा न्यायालय सुनावणी घेईल. पती प्रमाणे आपली हत्या होवू शकते, अशी भीती व्यक्त करीत पायल माहेश्वरीने यांनी अटकेपासून संरक्षण मागितले आहे. दरम्यान मानवीयतेच्या आधारे याचिकेवर काही आदेश पारित केले जावू शकतात का? यासंदर्भात विचार करु, असे खंडपीठाने आज स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने पायल यांच्या अंतरिम संरक्षणाच्या याचिकेला विरोध दर्शवला आहे. पायल यांनी पतीच्या अंत्यसंस्कारात हजर राहण्यास सरकारचा विरोध नाही. अंतिम संस्कार शुक्रवारी होणार असून जीवा यांचे शव लखनऊ वरुन मुजफ्फरनगरला घेवून जाण्यात येईल. परंतु पायल विरोधात अनेक गुन्हे दाखल असून उच्च न्यायालयातूनही त्यांना दिलासा मिळाला नसल्याचे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर