नवी दिल्ली १६ जून २०२३ : जागतिक बाजार पेठेत तेलाच्या किंमती दणकुन आपटल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. गेल्या १५ महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रणात नाहीत, त्या सतत घसरत आहेत. त्याचा भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. आज १६ जून रोजी कच्च्या तेलात मोठी घसरण पहायला मिळाली. ब्रेंट क्रूड ऑईल ७५.४८ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल ७०.४७ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.
केंद्र सरकारने २१ मे २०२२ रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल ८ रुपये तर डिझेल ६ रुपयांनी स्वस्त झाले होते.तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी सहा वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव पुढील प्रमाणे
मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे
अहमदनगर पेट्रोल १०७.१७ तर डिझेल ९३.६६ रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल १०६.१७ रुपये आणि डिझेल ९२०७२ रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल १०७.४८ तर डिझेल ९३.९३ रुपये प्रति लिटर
औरंगाबाद १०६.४२ पेट्रोल आणि डिझेल ९२.५१ रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल १०६.८९ आणि डिझेल ९३.३८ रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०६.२५ आणि डिझेल ९२.७९ रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल १०७.१९ तर डिझेल ९३.६९ रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल १०६.३९ तर डिझेल ९२.९२ रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल १०८.१८ तर डिझेल ९४.६५ रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल १०६.१८ रुपये आणि डिझेल ९२.६९ रुपये प्रति लिटर
परभणी पेट्रोल १०९.४७ तर डिझेल ९५.८६ रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव १०५.८४ आणि डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटर
रायगड पेट्रोलचा भाव १०५.८६ आणि डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर १०६.९९ रुपये तर डिझेल ९३.४९ रुपये प्रति लिटर
ठाणे पेट्रोलचा दर १०५.९७ रुपये तर डिझेल ९२.४७ रुपये प्रति लिटर
न्युज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर