कोल्हापुरातील ‘होलोग्राफिक शो’चा आराखडा तातडीने सादर करा, पालकमंत्री केसरकरचें आदेश

कसबा-बावडा, कोल्हापूर २६ जून २०२३: शाहू जन्मस्थळी पर्यटक आकर्षित होतील यासाठी, संग्रहालयाच्या पुढील टप्प्यातील होलोग्राफिक शो चा आराखडा तातडीने सादर करा, त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन समिती मधून देऊ असे आश्वासन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिले. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात अभिवादन प्रसंगी ते बोलत होते.

पुढील वर्षी २६ जून २०२४ रोजी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण जयंती होत आहे. या पार्श्वभूमीवर जन्मस्थळातील सर्व कामे पूर्ण करण्यात यावी, अशी अपेक्षा शिवप्रेमीतून व्यक्त करण्यात येत होती. याबाबत बोलताना पालकमंत्री केसरकर यांनी संग्रहालयाच्या उर्वरित कामाचा प्राधान्य आराखडा तयार करून, तो शासनाला सादर करा, अशी सूचना केलीय.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त आज सकाळी आठ वाजता, शाहू जन्मस्थळी पालकमंत्री दिपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शिर्के यांच्यासह हजोरो शिवप्रेमी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा