मुंबई, ५ जुलै २०२३ : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान जखमी झाला असून त्याच्या नाकावर व चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर तो मुंबईत आलाय. सध्या त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगितले जातय. काही दिवसांपासून अमेरिकेत शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता.
शाहरुख या आधीही बऱ्याच वेळा शूटिंग सेटवर जखमी झाला आहे. २००९ मध्ये त्याच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रईसच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया झालेली. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही तो जखमी झालेला.
बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करणारा २०२३ मधील चित्रपट ‘पठाण’ दिल्यानंतर, आता शाहरुख खानचे आणखी ३ मोठे चित्रपट २०२३ मध्येच प्रदर्शित होणार आहेत. जवान आणि डंकी या चित्रपटाचा यामध्ये समावेश आहे. जवान या चित्रपटाचे शूटिंग संपले असून, हा चित्रपट सप्टेंबर मध्ये हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होत आहे. या सोबतच सलमान खानच्या टायगर-३ मध्ये शाहरुख खानचा छोटासा रोल असणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे