दिल्लीत मुसळधार पावसाने २० वर्षांचा विक्रम मोडला, IMD ने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली, ९ जुलै २०२३: दिल्लीत शनिवारी विक्रमी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाळ्यातील हा पहिलाच मुसळधार पाऊस होता. दिल्लीत काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने २० वर्षांचा विक्रम मोडलाय. दुसरीकडे रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानेही दिल्लीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे राजधानीतील अनेक रस्ते आणि अनेक भागात पाणी तुंबले आहे. यासोबतच अनेक प्रकारच्या समस्याही पाहायला मिळत आहेत.

IMD म्हणजेच हवामान विभागानुसार, शनिवारी दिल्लीत १२६.१ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दशकांत म्हणजे २० वर्षांत कोणत्याही दिवशी इतका पाऊस पडला नाही. दिल्लीत जुलै २०१३ मध्ये १२३.४ मिमी आणि ०१ जुलै २०२२ मध्ये १७७ मिमी पाऊस झाला. जुलै १९५८ मध्ये दिल्लीत आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला होता.

दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक समस्या पाहायला मिळत आहेत. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले तुंबले आहेत. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा