‘लिटिल मास्टर’ सुनील गावसकर यांचा आज ७४ वा वाढदिवस, बीसीसीआयने दिल्या खास शुभेच्छा

पुणे, १० जुलै २०२३: भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा आज ७४ वा वाढदिवस आहे. सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. १९८३ च्या विश्वचषक संघाचाही ते महत्त्वाचा भाग होते. ‘लिटिल मास्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील गावस्कर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खास शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआयने ट्विट करून सुनील गावस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, सुनील गावस्कर यांच्या फोटोसह कॅप्शनमध्ये त्यांचे रेकॉर्डही शेअर केले आहेत. बोर्डाने एकाच ट्विटमध्ये गावस्कर यांची अनेक जुनी छायाचित्रे दाखवली. सुनील गावस्कर हे भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असुन त्यांनी भारतासाठी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ३००० हून अधिक धावा आणि कसोटीत १०,००० हून अधि धावा केल्या आहेत.

सुनील गावस्कर यांनी भारतासाठी १२५ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी १०१२२ धावा केल्या. भारतासाठी ३४ शतके आणि ४५ अर्धशतके केली. गावस्कर यांनी भारतासाठी १०८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०९२ धावा केल्या त्यात एक शतक आणि २७ अर्धशतके आहेत. त्यांची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १०३ आहे. त्याचबरोबर त्यांची नाबाद २३६ ही कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. सुनील गावस्कर यांनी प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २५ हजारांहून अधिक धावा केल्या असुन यामध्ये ८१ शतके आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे. गावस्कर यांनी प्रथम श्रेणीत त्रिशतक ठोकले ती सर्वोत्तम धावसंख्या ३४० धावा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा