टी२० मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

35

मुंबई : भारत वि. वेस्ट इंडीज तिसरा टी-२० सामना आज मुंबई येथील वानखडे मैदानावर होणार आहे. आज दोन्ही संघांसमोर विजय मिळवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

आता पर्यंतच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ असा विजय मिळवला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या तयारीने मैदानावर उतरणार आहेत.
भारताला या सामन्यासह मालिका जिंकायची असल्यास गोलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.