मुख्यमंत्र्यांचा दावा त्यावर नाना पटोले यांचा अजित दादाना प्रश्न,अजित पवार खरे आहे म्हणताच,देवेंद्र फडणवीस जोरजोरात बाक वाजवु लागले

मुंबई, २९ जुलै २०२३ : सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनादरम्यान काल विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण करताना एक दावा केला. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित दादा हे खरे आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या जागेवरुन उभे राहून होय, हे खरे आहे, असे सांगितले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत खूश झाले. ते जोरजोरात बाक वाजवायला लागले. यावेळी त्यांच्यासह इतर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारही जोरजोरात बाक वाजवू लागले.

सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी योजनेचे महत्त्व सांगत होते. यावेळी हा प्रसंग घडला. शासन आपला दारी कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झालेला आहे. विरोधी पक्षातील आमदारांनीदेखील या योजनेची मागणी केली आहे. त्यांनासुद्धा आपण या योजनेला लाभ देऊ. भेदभाव करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. या सगळ्या योजना एकाच छताखाली देण्याचा निर्णय आपण घेतला. तिथे लागणारी कागदपत्रे देखील तिथेच मिळणार. शासन आपल्या दारी या योजनेची माहिती घ्या आणि आपल्या लोकांना सांगा की ती योजना किती महत्त्वाची आहे. यामुळे सर्वसामान्यांना हेलपाटे घालण्याची गरज नाही. पूर्वी सगळे हेलपाटेवाले काम होते. आता हेलपाटे हा शब्द बंद, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी हेलपाटे शब्दावर भर दिला आणि ते वारंवार तेच बोलू लागले. त्यानंतर नाना पटोले यांनी अजित पवार यांना उद्देशून दादा हे खरे आहे का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर अजित पवार सभागृहात आपल्या जागेवरुन उठले होय हे खरे आहे असे म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्याने हसत जोरात बाक वाजवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा दावा केला. विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांना मनासारखे काम करता येत नव्हते, असा दावा शिंदेंनी केला. त्यावर अजित पवार यांनी होय, खरे आहे, असे म्हणत दुजोरा दिला.

अजित पवार जेव्हा आपल्या सरकार सोबत आले तेव्हाच त्यांनी सांगितले होते की देशाला पुढे न्यायचे असेल, देशाची उन्नती करायची असेल तर नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पाहिजे. या राज्य सरकारचे काम गतिमान आहे म्हणून मी या राज्य सरकार सोबत येतोय हे त्यांनी सांगितले. हे सांगितल ना त्यांनी. आता तिकडे (विरोधी पक्षात) काम करताना त्यांना अडचण येत होती, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा