शरद पवार एक राजकीय वास्तव…

दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार, मुरब्बी राजकारणी, पद्मविभूषण. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊ यात त्यांचा काटेवाडी ते मंत्री पदापर्यंतचा अनोखा प्रवास…

या एकोणऐंशी वयाचा एकूण एक अंश म्हणून वटवृक्षाच्या पारंब्या देशभरात, प्रत्येक क्षेत्रात खोलवर रुजल्या गेल्या आहेत.
१२ डिसेंबर १९४० ला पुणे जिल्ह्यात काटेवाडी, बारामती येथे त्यांचा जन्म झाला. बारामतीच्या सहकारी बँकेचे व्यवस्थापक गोविंदराव, शिक्षण समितीच्या प्रमुख शारदाबाई या दोघांकडून त्या बीजाची मशागत झाली.
वयाच्या १६ व्या वर्षी १९५६ साली शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देत त्या बीजाने मूळ धरण्यास सुरुवात केली. आणि बघता बघता छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.
पवारसाहेबांची स्मरणशक्ती फार अफलातून आहे. आयुष्यात एकदा भेटलेली माणसे त्यांच्या कायमची लक्षात राहतात. जुन्या जाणत्यांना ते अगदी नावानिशी हाक मारतात.
त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्यांनी ‘घर तेथे संकरित गाय’, ‘गाव तेथे सहकारी दूध सोसायटी’ हा दूग्ध व्यवसाय राबवला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेती, सहकार, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त कार्य. आणिबाणीत ५० ते ५५ वयाच्या सक्तीने निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात योगदान दिले.तसेच हिंगोलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे विद्यापीठ स्थापन केले. केंद्रीय कृषिमंत्री असताना माथाडी मंडळावरचा २४८ कोटींचा आयकर माफ केला.
१९८९ साली नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना.
साहित्य अकादमी पुरस्कार मिळणाऱ्या मराठी कलाकारांना राज्याकडून १ लाख रुपये देण्याचा निर्णय.
महाराष्ट्रासाठी ३ वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. महिलांना सैन्यदलात प्रवेश देण्याचा निर्णय सरंक्षणमंत्री असताना घेतला.
लातूरच्या किल्लारी भूकंपावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार ३ महिने तळ ठोकून होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आणि राज्य महिला आयोग स्थापन करण्यात योगदान.
गहू आणि तांदळाच्या उत्पादनात भारताने यशस्वी झेप घेतली ती शरद पवार कृषिमंत्री असताना. कृषिमंत्री झाल्याबरोबर शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. आजही तेवढ्याच हिमतीने धैर्याने राजकारणात राहून समाजकारण करत शरद पवार हे ‘पवार साहेब’ बनले आहेत. पवारसाहेबांचे राजकारण की, राजकारण म्हणजेच पवारसाहेब हे भल्या-भल्यानां आजही समजणे कठीण आहे.
राजकीय कारकीर्द

● १९६७ : बारामती मतदारसंघातून आमदार
● १९७८ : पहिल्यांदा मुख्यमंत्री
● १९८८ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
● १९९० : तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
● १९९३ : चौथ्यांदा मुख्यमंत्री
● १९९१: केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री
● १९९६ : राज्य विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते
● २००४ : देशाचे कृषिमंत्री
● २०१० : बीसीसीआयचे अध्यक्ष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा