राहुल गांधी यांना मोठा दिलासा, गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२३ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी आडनावा प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे संसदेच्या चालु अधिवेशनात राहुल गांधी संसदेत दिसण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत सत्यमेव जयते असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सत्र न्यायालयाला फटकारले आहे. ट्रायल कोर्टाला एवढी मोठी शिक्षा देण्याची गरज काय होती? एवढी शिक्षा देण्यामागचे कारणही कोर्टाने दिलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी कोर्टाने राहुल गांधी यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. राहुल गांधी यांचे विधान आपत्तीकारक होते. मात्र, एवढी मोठी शिक्षा देण्याचे कारण कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही. तसेच त्यावर गुजरात उच्च न्यायालयाने विचारही केला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, मोदी आडनाव घेतल्याने कुणाचीही बदनामी झाली नाही. पण राहुल गांधी यांनी बोलताना जपून प्रतिक्रिया द्यावी, असे कोर्टाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. द्वेषावर प्रेमाने मिळवलेला हा विजय आहे. सत्यमेव जयते, जय हिंद असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा