मुंबईतील जलाशयामध्ये आढळला महाकाय विषाणू

मुंबई: मुंबईतील जलाशयांमध्ये एक महाकाय विषाणू आढळून आला आहे. आयआयटी मुंबईच्या बायो सायन्स विभागाच्या शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनी हा महाकाय विषाणू शोधून काढला आहे.
मुंबईतील कुर्ला तलावात तसेच बांद्रा, पवई या जलाशयांमध्ये ही हा वायरस आढळून आला आहे. याला शास्त्रज्ञांनी वांद्रे मेगा वायरस, कुरला वायरस, मिमी वायरस आणि पवई लेक वायरस अशी नावे दिली आहेत. हे विषाणू इतर विषाणूंचा तुलनेत अधिक वेगाने मोठे होत असले तरी याचा मानवी शरीरावर कोणताही प्रभाव होत नाही असेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा