नवाब भाईंनवर खोटे आरोप करून केसेस कोणी केल्या? सुप्रिया सुळे यांचा सवाल

मुंबई १६ ऑगस्ट २०२३ : महाविकास आघाडीचे सरकार असताना नवाब मलिक हे मंत्री होते. त्यांच्यावर मनी लाँड्रींगसह कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झाले होते. तर त्यांच्यावर ईडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला. ज्यामुळे ते गेली १७ महिने तुरंगात होते. दोन दिवसांपूर्वी ते वैद्यकीय कारणाने जामीनावर सुटले असुन दोन महिन्याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना देताना ईडीने कोणताही विरोध केला नाही. यामुळे यामागे भाजपची खेळी असल्याची शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

दरम्यान त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी अजित पवार गट सक्रीय झाला आहे. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांनी मलिक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच चर्चा देखील केली. त्यावरून ते अजित पवार गटात जातील असा तर्क लावला जात आहेत. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी नवाब भाई आणि त्यांच्या कुटुंबाला या अन्यायाविरुद्ध ज्या पद्धतीने लढताना पाहिले आहे. नवाब भाईंना अडचणीत कुणी आणले, नवाब भाईंवर आरोप कोणी केले, नवाब भाईंवर अन्याय कोणी केला त्यांच्यावर खोटे आरोप कोणी केले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. नवाब भाईंवर कुठल्या काळात कोणत्या परिस्थितीत केस केली हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. याच्यात मला जास्त काही बोलायची गरज नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मी नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. कोणी कुठला राजकीय निर्णय कसा घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नवाबभाई माझ्याकरता नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिलेला एक द्रष्टा नेता आहेत. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने त्यांच्यावर अन्याय केला ते राजकीय सुडाचे अतिशय दुर्दैवी राजकारण आहे. आत्ता त्यांच्या कुटुंबाला ते घरी आले आहेत याचा आनंद आहे.आम्हालाही आनंद आहे. ज्या परिस्थितीत त्यांचे कुटुंब लढले आहे याला सलाम केला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा