पीएम मोदींच्या घोषणेनंतर २४ तासांत विश्वकर्मा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विश्वकर्मा योजना लागू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर २४ तासांच्या आत केंद्र सरकारने या योजनेस मंजुरी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या या योजनेद्वारे ओबीसी वर्गाला खूश ठेवण्याचा प्रयत्न आहे.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या स्वतंत्रदिनाच्या भाषणात याबद्दल घोषणा केली होती. अशी माहिती आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ही योजना सुरू केली जाणार आहे. सोनार, गंवडी, लोहार यांसारख्या काम करणाऱ्या लोकांपर्यंत मदत पोहोचवणे हा केंद्राच्या या योजनेचा उद्देश आहे. लाल किल्ल्यावरून घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सुरवातीला ही योजना १५ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केली जाईल आणि नंतर तरतूद वाढवली जाईल.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा