बिहारमधील पत्रकाराच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक

अररिया, बिहार १९ ऑगस्ट २०२३ : बिहारमधील अररिया जिल्ह्यातील राणीगंज येथे पत्रकाराची गोळ्या झाडून काल सकाळी हत्या करण्यात आली होती. विमल यादव असे या पत्रकारांचे नाव होते. या प्रकरणी आठ संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. यामधील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे.

बिहारमधील राणीगंज येथील पत्रकार विमल यादव याला घराबाहेर बोलवत, गेटवरुन चढून विमल यांच्या छातीत अज्ञाताकडून गोळ्या घालण्यात आल्या. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आणि तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बिहार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत शोधमोहीम सुरू केली होती.

बिहार पोलिसांनी आज माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पत्रकारांच्या हत्याप्रकरणी उमेश यादव, विपिन यादव, भावेश यादव, अशिष यादव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर रुपेश यादव आणि क्रांती यादव हे अररिया कारागृहात असून, आणखी दोन संशयित आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा