पुणे, १३ सप्टेंबर २०२३ : भारतीय संघ आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला दावेदार बनला आहे. काल भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला. या स्पर्धेत भारत आता अंतिम सामन्यात आपली जादू दाखवणार आहे. आशिया चषक २०२३ च्या सुपर-४ फेरीत अजून २ सामने बाकी आहेत, जे १४ सप्टेंबरला पाकिस्तान-श्रीलंका आणि १५ सप्टेंबरला भारत- बांगलादेश यांच्यात होणार आहे. आणखी एका संघाचा टॉप २ मध्ये समावेश केला जाईल आणि त्यानंतर १७ सप्टेंबरला हाच संघ अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने काल आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम १०,००० धावा पूर्ण केल्या. भारतीय संघ आतापर्यंत दहा वेळा आशिया कपसाठी पात्र ठरला आहे. भारताने वन डे मधील श्रीलंकेची सलग १३ विजयांची मालिका खंडित केली आहे. आशिया चषक स्पर्धेतील इतर संघांच्या तुलनेत भारत हा खूप मजबूत संघ मानला जातो. काल भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतले. कर्णधार रोहित शर्माने ४८ चेंडूत ५३ धावा, केएल राहुलने ३९ धावा, विराट कोहलीने ३ धावा आणि इशान किशनने ३३ धावा केल्या. कमी धावसंख्या असूनही भारताने ४१ धावांनी विजय मिळवला आहे.
आशिया कप २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध दोन सामने खेळले गेले, तर सुपर ४ फेरीत इतर दोन सामने पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध खेळले गेले. भारताने सर्व सामने जिंकले आहेत. ग्रुप स्टेजच्या भारत-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे कोणताही निकाल लागला नाही आणि त्यामुळे १-१ गुण शेअर केल्यानंतर सामना रद्द करण्यात आला.
भारताने DLS पद्धतीने नेपाळचा १० गडी राखून पराभव केला, पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला आणि काल श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड