पुणे, २३ सप्टेंबर २०२३ : हिंडेनबर्ग अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदानी उद्योग समूहाला महावितरणच्या कंत्राटामुळे ऊर्जा मिळणार आहे. राज्यात ‘स्मार्ट वीज मीटर’ बसविण्यासाठी महावितरणने २७ हजार कोटी रुपयांचे कंत्राट काढलय, त्यातील १३ हजार ८८८ कोटी रुपयांचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. या कंपनीकडे पुणे, बारामती, भांडूप, कल्याण आणि कोकण या महावितरणच्या परिमंडळातील स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम दिले आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड ने राज्यातील स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपन्यांची माहिती गुरुवारी प्रसिद्ध केली. या आदेशानुसार अदानी एन.सी.सी, मॅंटिकालो आणि मेससे जीनस या कंपन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे २७ हजार कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यातील जवळपास निम्म्या रकमेचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे.
महावितरणच्या सर्वच परिमंडळात २ कोटी २४ लाख ६१ हजार ३४६ स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यासाठी ५ हजार कोटी ६९ लाख रुपये खर्च येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कंत्राट दिले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर