भारतासह “या” देशात दिला जातो मृत्यूदंड

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : देशभर निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची चर्चा आहे. त्याचबरोबर, हैदराबाद प्रकरणानंतर चूक करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या तरतुदीची व्याप्ती वाढविण्याची मागणी होत आहे.
परंतु तुम्हाला माहीत आहे का की, जगात असे एकूण किती देश आहेत त्या देशात कोणत्याही गुन्ह्यास फाशीची शिक्षा दिली जाते. जगाच्या पाठीवर असे एकूण ५३ देश आहेत जिथे कोणत्याही गुन्ह्यास फाशीची शिक्षा दिली जाते. अर्था या ५३ देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.
या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला त्या सर्व ५३ देशांची नावे सांगत आहोत. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, जगातील १४२ देशांनी कोणत्याही प्रकारे फाशीची शिक्षा देण्याची तरतूद रद्द केली आहे.
या देशांमध्ये गुन्हा कितीही भयंकर असला तरी कोर्ट दोषी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावू शकत नाही.

हळूहळू अन्य देशदेखील या तरतुदींवर विराम देत आहेत. ज्या देशांनी नुकतीच फाशीची तरतूद रद्द केली आहे २०१५ मध्ये मेडागास्कर, २०१६ मध्ये बेनिन, २०१७ मध्ये गिनी आणि २०१८ मध्ये बुर्किना फासो.

सर्व ५३ देशांची नावं –

अफगाणिस्तान

भारत

नायजेरिया

अमेरिकेची काही राज्ये

इराण

जपान

तैवान

कुवैत

झिम्बाब्वे

लिबिया

थायलंड

गुयाना

युगांडा

बांगलादेश

इराक

इंडोनेशिया

बोत्सवाना

संयुक्त अरब अमिराती (युएई)

बहामास

क्युबा

बेलारूस

येमेन

सौदी अरेबिया

व्हिएतनाम

सीरिया

इजिप्त

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (डीआरसी)

इथिओपिया

चीन

सुदान

कोमोरोस

सोमालिया

बार्बाडोस

मलेशिया

चाड

पाकिस्तान

ओमान

सिंगापूर

सेंट किट्स आणि नेव्हिस

सेंट लुसिया

बहरेन

उत्तर कोरिया

विषुववृत्त गिनी

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स

पॅलेस्टाईन प्रांत

त्रिनिदाद आणि टोबॅगो

लेसोटो

अँटिगा आणि बार्बुडा

बेलिझ

डोमिनिका

जमैका

जॉर्डन

दक्षिण सुदान

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा