संसदेत गदारोळ करणाऱ्या लातूरच्या तरुणाघरी दहशतवादी विरोधी पथक दाखल, कुटुंबीयांकडे केली चौकशी

लातूर १४ डिसेंबर २०२३ : काल लोकसभेचे हिवाळी सत्र सुरु असताना, संसदेत सुरक्षा तोडून गदारोळ करणाऱ्यांपैकी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील ‘झरी’ या गावचा असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या झरी गावामध्ये पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक दाखल झाले असुन त्यांनी अमोलच्या कुटुंबीयांची चौकशी केली तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला.

अमोल शिंदे यांने १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले असुन त्याचे आई वडील हे मजुरी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसंपासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बाहेर गावी राहत होता आणि या काळातच त्याचा दिल्ली येथील इतरांशी संपर्क झाला असुन त्याने कोणत्या प्रतिबंधित संघटनेच्या माध्यमातुन संसदेत गदारोळ केला का? याचा तपास आता लातूर पोलिस आणि दहशतवादी विरोधी पथक करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा