आ.जितेंद्र आव्हाड यांच्या वाद ग्रस्त वक्तव्यकेल्याने पुतळयाचे दहन करुन भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त

भोकरदन ६ जानेवारी २०२४ : प्रभु श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करुन तमाम हिंदु बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी, भोकरदन तालुक्याच्या वतीने आमदार संतोष पाटील दानवे यांच्या सुचनेनुसर भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले यांच्या नेतृत्वात भोकरदन येथील छ. शिवाजी महाराज चौकात आ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळयास जोडे मारत पुतळयाचे दहन करुन तहसिलदार भोकरदन यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी भाजयुमो तालुका अध्यक्ष दिपकशेठ जाधव, भाजपा शहराध्यक्ष सतिशबापु रोकडे, भाजयुमो शहराध्यक्ष दिपक मोरे, मदनशेठ कुलवाल, गंगाधर कांबळे, नगरसेवक सर्वश्री सुरेश शर्मा, दिपक तळेकर, रणविर देशमुख, दिपक बोर्डे, राहुल ठाकुर, योगेश शर्मा, शंकर सपकाळ, डाॅ.संजय देशपांडे, ऋषी पगारे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा