क्षेत्रभेटी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बांबू शेती.

11

जालना, ८ जानेवारी २०२४ : संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांना शाळेतील विषयांबरोबरच प्रत्यक्ष विज्ञान आणि भूगोल याविषयी माहिती देण्यासाठी क्षेत्रभेटीचा उपक्रम सुरू केला. त्या अनुषंगाने इयत्ता दहावीच्या शंभर विद्यार्थ्यांना डॉ. सुयोग कुलकर्णी यांच्या शेतावर नेण्यात आले. तेथे त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती आणि शेती व्यवसायाची माहिती देण्यात आली.

प्रगतशील शेतकरी डॉ. सुयोग्य कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बांबू शेती, सिताफळ, जांब, गोपालन या संदर्भात विशेष माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, बांबू शेती ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. कारण बांबू या पिकाला पाणी कमी लागते. त्यामानाने उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळते. शिवाय आंतरपीक घेऊन शेतकरी दुहेरी नफा मिळू शकतो.

या क्षेत्रभेटीचे आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी, शारदा दहिभाते यांनी केले होते. दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर व्यवसायाचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. या क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्ष शेती आणि तेथे लावलेल्या विविध पिकांची माहिती विद्यार्थांना घेता आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी